Pune Crime: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात चोरी; दानपेट्या फोडून 2 लाखांची रोकड लंपास
Updated On:

पुणे- येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
मंदिराचे विश्वस्त सुधीर वसंतराव वांबुरे (वय ६७, रा. येरवडा गाव) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा गावातील टेकडीवर श्री तारकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून चोरटा आत शिरला.
मंदिरात ठेवलेल्या सहा दानपेट्या फोडून चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहेत. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपाससाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक फौजदार पाटील तपास करत





