Pune Crime | पीएमपी वाहक महिलेचा विनयभंग ; आरोपीवर गुन्हा दाखल
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पीएमपीतील वाहक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हडपसर भागात ही घटना घडली.याबाबत वाहक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विजयकुमार उद्धवराव हारकाळ ( ३२, रा. खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला पीएमपीत वाहक आहेत.
आरोपीने प्रवासी तिकिटावरुन वाहक महिलेशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार तपास करत आहेत.





