Pune Crime: पुर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; दोघांना अटक

पुणे – पुर्व वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुन्हयातील दोघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना जानेवारी महिण्यात घडली होती. गोपी वेताळ व पप्पू कांबळे (दोघेही रा.कात्रज संतोष नगर पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसोर फिर्यादी सुरज दिगंबर शेजवळ (27 रा.सिध्दीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड पुणे) याची गोपी वेताळ व पप्पू कांबळे यांचे बरोबर पूर्वी भांडणे झाली होती. दिनांक 13 जानेवारी रोजी सुरज शेजवळ हा सिध्दीविनायक सोसायटीचे पार्किंग मध्ये असताना आरोपींनी भांडणाचा राग मनात धरुन त्याचे डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच कमेरवर फरशी मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा झाले नंतर यातील आरोपी हे फरार झाले होते. दरम्यान 10 फेब्रुवारीला आरोपी हे स्वामी नारायण भागात पडीत बंगल्यात लपून बसल्याची खबर तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम सांवत यांना मिळाली. त्यानूसार त्यांना सापळा रचून पकडण्यात आले.
ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा, पोलीस नाईक सचिन पवार, पोलीस शिपाई विक्रम सांवत,पोलीस शिपाई आशिष गायकवाड, पोलीस शिपाई धनाजी धोत्रे, पोलीस शिपाई सचिन गाडे व पोलीस शिपाई अवधुत जमदाडे यांचे पथकाने केली आहे.





