Pune Crime : पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा दाखल

पुणे – पूर्व वैमनस्यातून पालघन आणि कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन सराईतांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू धनगर, सुमित जाधव, विकी गंधाल आणि कुणाल चेमूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत रोहित रागिर (20, रा. घोरपडे पेठ) यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तपास अधिकारी सुशिल बोबडे यांनी सांगितले, यातील फिर्यादी रोहित रागीर हा त्यांचे मित्रांसह गप्पा मारत उभा असताना दि. 11 जुलै रोजी भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हातामध्ये कोयते व पालघन घेऊ्न तु माझ्या भावाला मारलेस का ? म्हणत त्याच्या हातातील पालघनने फिर्यादीच्या डत्तेक्यात वार केला.
तसेच त्याचा साथीदार याने याला संपवा म्हणत हातामधील कोयत्याने डोक्यात, पाठीत तसेच दोन्ही हातावर वार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घोरपडेपेठ येथील गफुर हाईटसच्या पार्कींगमध्ये घडली.





