Pune Crime: मोलकरणीने केली जेष्ठ महिलेच्या घरातून दागिन्यांची चोरी; औंध परिसरातील घटना
Updated On:

पुणे – घरातील मोलकरणीने जेष्ठ महिलेची नजर चुकवून घरातील २ लाख ९६ हजारांच्या दागिन्यांची चोरी केली. ही घटना २२ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर कालावधीत घडली. याप्रकरणी जेष्ठ महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
फिर्यादी जेष्ठ महिला औंधमध्ये राहायला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडे मोलकरीण कामाला होती. तिने जेष्ठ महिलेची नजर चुकवून २२ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर कालावधीत २ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि डायमंडची चोरी केली. चोरी झाल्याचे समजल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव तपास करीत आहेत.





