Pune Crime: 2000ची लाच घेताना ASI अँटी करप्शनच्या जाळ्यात
Updated On:

पुणे – वॉरंट रद्द करून देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागून दोन हजार घेणाया सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कोंडाजी दामोदर रेंगडे (वय ५३) एएसआय, घोडेगाव पोलीस ठाणे असे त्याचे नाव आहे.
तक्रारदाराविरूद्ध गुन्हा दाखल असून घोडेगाव न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी तक्रारदार न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने वॉरंट काढले होते. ते वॉरंट रद्द करून देण्यासाठी एएसआय रेंगडे यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रूपये घेताना त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.





