Pune Crime : पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलेची सोनसाखळी लांबविली
Updated On:

पुणे – शहरातील पीएमपीएल बसने प्रवास करीत असताना चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चेन चोरून नेली. ही घटना काल सकाळी साडेनउच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते महानगरपालिका व चंदननगर प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी ७४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला काल सकाळी सव्वा नउच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते चंदननगर असा बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चेन चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार शेवाळे तपास करीत आहेत.





