Pune Crime : मुंढव्यात बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; दोन्ही गटा विरुद्ध गुन्हा दाखल

pune news : मोबाईल मध्ये व्हिडीओ काढण्याच्या वादातून मुंढवा येथील लोकल बार मध्ये फ्रि स्टाईल हाणामारी करणार्या दोन्ही गटा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या बारचा खाद्य परवाना रद्द करण्यात आला आहे.
लोकल बार हा मुंढवा येथील एसीबी रस्त्यावरील मॅट्रिक्स इमारतीत आहे. 1 फेबुवारीच्या रात्री राहूल जैसवार, रोहित जैसवार आणि रितीक उडता हे लोकल बार मध्ये मारहाण झाल्याचे सांगत मुंढवा पोलिस ठाण्यात आले होते.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून सीसीटीव्हीचे फुटेजची पाहणी केली असता 31 जानेवारीच्या रात्री लोकल बार मध्ये मोबाईल मध्ये व्हिडीओ काढण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची माहिती मिळाली.
तसेच हा घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. मात्र दोन्ही गटाच्या वतीने फिर्याद देण्यासाठी पुढे आले नसल्याने सरकार पक्षातर्फे पोलिसांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही गटा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक निळकंठ जगताप करत आहेत.





