Pune Crime: मुळा मुठा नदीत आढळला शीर, हात-पाय नसलेला महिलेचा मृतदेह

पुणे – पुणे शहरातील चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुळा मुठा नदीत शीर, हात-पाय नसलेल्या अवस्थेत महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काल दुपारी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मूळा मुठा नदी पत्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला आहे. शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र मृतदेह होता.
ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शिवविच्छेदन करण्यात आले आहे. अंदाजे 50 ते 60 वयाचा तो स्त्री जातीचा मृतदेह आहे. चंदन नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेतला जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह सापडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर मृत्यू झाला होता.”
View this post on Instagram





