Dance instructor arrested: चार वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या नृत्य प्रशिक्षकाला अटक

Dance instructor arrested – पुणे शहरातील वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य प्रशिक्षकाने चार वर्षांच्या बालकेशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारून कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा नृत्य प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
नृत्य प्रशिक्षकाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याबाबत बालिकेने पालकांकडे तक्रार केली. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर शाळेने सायंकाळी खुलासा केला. संबंधित शिक्षकाविरुद्ध शाळेकडून कठोर कारवाई करण्यात आली असून, त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले.
नृत्य प्रशिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असा खुलासा शाळेने केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून याप्रकरणाची चाैकशी करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन नृत्य प्रशिक्षकाला अटक करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.





