Pune Crime : कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास बेड्या

Pune Crime : बेकायदेशीररित्या कमरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या सराईत आरोपीला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित श्रीनिवास राहगीर (वय-२४, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रेकॉडवरील आरोपी रोहित राहगीर जवळ गावठी पिस्टल असून तो गंज पेठेतील मिठा पेल्ली या ठिकाणी थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार हर्षल दूडम यांना मिळाली होती.
यानंतर सापळा रचून रोहित राहगीर याला ताब्यात घेतले असता गावठी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काढतूस असा ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित राहगीर हा रेकॉडवरील आरोपी असून त्याच्यावर खडक आणि पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, तुळशीराम टेभुर्णे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.





