Pune Crime : अट्टल गुन्हेगार एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत ‘जेरबंद’

पुणे – लोणी काळभोर पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगारास एम.पी.डी.ए.कायद्याअंतर्गत जेरबंद केले आहे. संबंधीत गुन्हेगारावर सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याची परिसरामध्ये मोठी दहशत होती. ऋषिकेश सुरेश पवार (23, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये म्हणुन े शहरातील अवैध धंदे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करण्याचा आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.
त्यानूसार नव्याने पोलीस आयुक्तालयात समावेश झालेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश पवार यास एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत जेरबंद करण्यात आले. तो राहत असलेल्या परिसरामध्ये स्वतः तसेच त्याचे साथीदारांसह लाकडी, दांडके, दगड विटा, सुरा, कु-हाड, कोयता, लोखंडी पाईप या सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगुन सामान्य नागरीकांवर दहशत पसरवत होता. तसेच त्याने मारहाण करुन, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनीक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे,बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
मागील 5 वर्षामध्ये लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे 6 गुन्हे दाखल आहेत. त्यांचे गुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या पासुन जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरीक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी ऋषिकेश त्यास स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी,पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक अमित साळुखे, पोलीस नाईक भोंगळे यांनी केली आहे.





