Pune Crime: भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला नागरिकांची मारहाण; एका चोरट्याचा मृत्यू
Updated On:

पुणे – चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोपाननगर, संत नगर परिसरात मध्यरात्री भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला पकडून नागरिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये एका चोरट्याचा जागीच मृत्यू झाला.
‘इकड ट्रेडर्स’ या भंगार दुकानाच्या मालकाने स्वतः पोलिसांना माहिती दिली की, रात्री सुमारे तीनच्या सुमारास तीन चोरटे दुकानात चोरीसाठी आले होते. त्यावेळी मालकाने इतर सहा ते सात जणांच्या मदतीने त्या चोरट्यांना पकडले. त्यानंतर दोराने बांधून दांडक्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये एका चोरट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.





