Pune News : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा थरार! दहावीच्या परीक्षेतील भांडणाचा राग; भिडे पुलाजवळ १६ वर्षीय मुलावर कोयत्याने वार
Pune News : पुणे शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भिडे पुलाजवळ सोमवारी (२ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune News : दहावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या भांडणातून पोलिसांकडे तक्रार दिल्याचा राग मनात धरून सहा अल्पवयीन मुलांनी १६ वर्षीय मुलावर कोयते आणि धारदार शस्त्रांनी वार करून खुनाचा प्रयत्न केला. भिडे पुलाजवळ सोमवारी (२ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. (Pune News)
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात शौर्य विशाल मोहिते (वय १६, रा. घोरपडी पेठ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौर्य हा गरवारे महाविद्यालयात अकरावीत शिकतो. तो दहावीत असताना सिमला ऑफिस परिसरातील भारत इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र होते. परीक्षा सुरू असताना त्याचा शाळेतील काही मित्रांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. (Pune News)
त्यावेळी संबंधित मुलांनी शाळेच्या आवारात शौर्यला मारहाण करून त्याचा व्हिडिओ तयार केला होता. शाळेबाहेर आल्यानंतरही या मुलांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या शौर्यने शिवाजीनगर पोलिस चौकीत धाव घेतली. (Pune News)
त्यानंतर त्याचे वडील आणि मारहाण करणाऱ्या मुलांचे पालक पोलिस चौकीत आले. दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाल्यानंतर पोलिसांनी समज देऊन त्यांना सोडले होते. (Pune News)
मात्र, शौर्यने पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग संबंधित मुलांनी मनात धरला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजीनगर येथील वृद्धेश्वर घाट परिसरात जुना वाद मिटविण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. (Pune News)
दरम्यान, सोमवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी शौर्य मित्रांसोबत फिरायला गेला होता. त्यावेळी त्याला भिडे पुलाजवळ भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तो मित्रासोबत तेथे पोहोचल्यानंतर भारत इंग्लिश स्कूलमध्ये मारहाण करणाऱ्या मुलांनी ‘तू आमची नावे पोलिसांना का सांगितली?’ अशी विचारणा करत शिवीगाळ सुरू केली. (Pune News)
त्यानंतर एकाने कमरेला लावलेला कोयता काढून शौर्यच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शौर्यने वार चुकवून पळ काढला. त्याचे मित्रही आरडाओरडा करत पळू लागले. (Pune News)
पळताना शौर्य खाली पडला. त्यानंतर सहाही जणांनी त्याच्यावर कोयते आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. शौर्यने बचावासाठी हात आडवा केला असता त्याच्या हाताला आणि बोटांना गंभीर दुखापत झाली. तसेच डोक्याच्या मागील बाजूस आणि मध्यभागी कोयत्याने वार करण्यात आले. नागरिक जमा झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. (Pune News)
शौर्यच्या मित्रांनी त्याला तातडीने पूना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Pune News)
डेक्कन पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याचा जबाब नोंदविला. त्यानुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस निरीक्षक रणजितसिंग परदेशी तपास करत आहेत. (Pune News)





