Pune Crime : सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल असलेला जेरबंद

पुणे – सरकारी कामात अडथळ्याचा लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हात फरार असलेल्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. सुनील चंदर वाळुंज (वय 45, रा. मगर वस्ती, लोणीकंद) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे चार गुन्हे दाखला आहेत.
शहराच्या हद्दीत पोलीस गस्त घाल होते. त्यावेळी हवालदार राजपूत, हवालदार साठे यांना माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस स्टेशन येथे सरकरी कामात अडथळ्याच्या गुन्हात पाहिजे असलेला वाळुंज हा राहत्या घरी येणर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, अंमलदार हवालदार राजपूत, साठे, पोलीस नाईक चौधर, सोनवलकर, शिपाई बेले यांनी सापळा रचून वाळुंज याला अटक केली. गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, हवालदार राजपूत,हवालदार साठे , नाईक चौधर, सोनवलकर, शिपाई बेले यांनी ही कारवाई केली.





