PUNE CRIME : दरोडा प्रकरणात एकाला अटकपूर्व जामीन मंजुर
Updated On:

पुणे – रांजगणाव एमआयडीसी येथे दुकानात दरोडा टाकत 3 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्या प्रकरणात एकाला अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.जी.चव्हाण यांनी हा आदेश दिला आहे.
समाधान विठ्ठल भुसणे (रा. हडपसर, मूळ. नागरसोगा, ता. औसा, जि. लातुर) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात त्याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे.
त्याचा घटनेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. त्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा युक्तीवाद ऍड. सोनार यांनी केला. ही घटना 4 मार्च 2023 रोजी घडली होती.
त्या दुकानातील कामगार धनराज इगवेने साथीदारांसह माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भुसणे याच्यावर गुन्हा दाखल आहे




