Pune Crime : किरकोळ वादातून थेट घरात घुसले; लोणी काळभोरमध्ये टोळक्याने महिलांवर उगारले शस्त्र, चौघे अटकेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – किरकोळ वादातून टोळक्याने महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी तुषार रामलिंग घोडे (२५, रा. रामटेकडी, हडपसर), सर्फराज समीर शेख (२०, रा. गंगानगर, हडपसर), करण कन्हैया गुजराती (२०), हरुन जावेद शेख (२२, रा. वैदुवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची बहीण लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात राहायला आहे. १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमराास आरोपी घोडे, शेख, गुजराती, शेख हे महिलेच्या घरात शिरले. महिला आणि तिच्या बहिणीला बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्र उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करत आहेत.





