Pune : बनावट कॉल सेंटरद्वारे दाम्पत्याची फसवणूक

पुणे – पन्नास लाख रुपयांची पॉलिसी काढल्यानंतर तितक्याच रकमेचे शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटरचा दत्तवडी पोलिसांनी पर्दाफाश केला होता.
या प्रकरणात पोलिसांनी ठाणे येथील दानेश रवींद्र बिद्र (वय 24) आणि रोहित संतोष पांडे (वय 25) या दोघांना अटक केली होती. दरम्यान, या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
दोघांनी अॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. सोनार यांना अॅड. प्रशांत कांबळे, अॅड. प्रमोद राठोड यांनी सहकार्य केले. याबाबत सहकारनगर येथील 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महिला आणि तिच्या पतीची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाली होती.
दरम्यान, तक्रार दाखल होताच पुणे पोलिसांनी मुलुंड येथे कारवाई करत या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला. दोघांना खोट्या गुन्ह्यात अडकाविल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने केला.





