पुणे : 226 नवे करोनाबाधित
Updated On:

पुणे – दिवसभरात 226 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, 142 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. याशिवाय सात बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीन पुण्याबाहेरील आहेत. गेल्या 24 तासांतील बाधितांच्या संख्येचा समावेश करून आजपर्यंत 4 लाख 89 हजार 732 जण बाधित झाले आहेत. त्यातील 4 लाख 78 हजार 771 बाधित बरे झाले आहेत. मात्र 8 हजार 832 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या, असलेल्या बाधितांमध्ये 2 हजार 129 जण सक्रिय बाधित असून, त्यातील 204 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय 325 जण ऑक्सिजन उपचार घेत आहेत. दिवसभरात 9 हजार 485 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली असून, आजपर्यंत 29 लाख 77 हजार 281 जणांची तपासणी करण्यात आल्याची आरोग्य यंत्रणेकडे नोंद आहे.





