सावधान…शहरात 3 हजार 67 नवे रुग्ण

पुणे –राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून पुणे शहरातील यंत्रणेला सावधानेतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात सोमवारी नव्या करोना बाधितांच्या संख्या रविवार पेक्षा कमी असली तरी ती तीन हजारांपेक्षा जास्त आहे. सोमवारी 3 हजार 67 नव्या बाधितांची नोंद झाली. तर शहरातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
करोना बाधितांची संख्या वाढण्याला सुरूवात झाली आहे. रविवारी बाधितांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली तर सोमवारी तीन हजारांच्या आसपास बाधित आहेत. गेल्या 24 तासांत झालेल्या दोन मृत्यूंचा समावेश करून आजपर्यंत 9 हजार 129 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्यांची संख्याही पाच लाखांच्या पुढे गेली असून, ती 5 लाख 2 हजार 875 आहे. त्यात गेल्या 24 तासांत डिस्चार्ज दिलेल्या 857 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 15 हजार 139 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. तर आजपर्यंत 39 लाख 92 हजार 520 संशयितांच्या टेस्ट झाल्या आहेत. त्यात 5 लाख 29,102 जण बाधित आढळले आहेत.
17 हजार सक्रीय बाधित…
सक्रीय बाधितांची संख्या 17 हजार 98 झाली असून, त्यातील 5.10 टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील 17 जणांची प्रकृती गंभीर, 17 जणांची स्थिर तर 143 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.





