पुणे- गेल्या 24 तासांत नव्या 170 करोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तिघे पुण्याबाहेरील होते.
आजपर्यंत 33 लाख 6 हजार 212 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या. त्यातील 4 लाख 99 हजार 788 जण बाधित आढळले असून, त्यातील 4 लाख 89 हजार 206 बाधित बरेही झाले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांत डिस्चार्ज दिलेल्या 192 जणांचा समावेश आहे. सध्या असलेल्या बाधितांमध्ये 1 हजार 573 सक्रीय बाधित असून, त्यामध्ये 178 जणांची प्रकृती गंभीर आहेत. तर 263 बाधितांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या एकाचा समावेश करून आजपर्यंत 9 हजार 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 8 हजार 458 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या आहेत.