पुणे शहरात करोनाचे नवे 199 बाधित
Updated On:

पुणे – गेल्या 24 तासांत शहरात करोनाचे 199 बाधित आढळले आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 8 आहे. यात 5 जण पुण्याबाहेरील आहेत.
आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 98 हजार 667 झाली आहे; तर त्यातील 4 लाख 87 हजार 823 बाधित बरे झाले आहेत. त्यात डिस्चार्ज मिळालेल्या 225 जणांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 986 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सक्रीय बाधितांची संख्याही कमी होऊन दोन हजारांच्या आत आली असून, सध्या ती 1 हजार 858 आहे. त्यातील 188 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 271 जण ऑक्सिजनवर आहेत. गेल्या 24 तासांत 7 हजार 973 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे.





