पुणे : 178 नवे करोना बाधित; 194 जणांना डिस्चार्ज
Updated On:

पुणे – दिवसभरातील करोना बाधितांची संख्या काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी 178 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, बरे झालेल्या 194 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत झालेल्या 32 लाख 44 हजार 744 स्वॅब टेस्टमध्ये 4 लाख 98 हजार 468 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 4 लाख 87 हजार 598 बाधित बरे झाले. परंतु 8 हजार 983 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या दोन जणांचा समावेश असून, याशिवाय हद्दीबाहेरील दोघांचा मृत्यू झाला आहे.
एकूण बाधितांमधील 1 हजार 887 बाधित सक्रीय असून, त्यातील 191 बाधितांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 266 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.





