पुणे : नव्या करोनाबाधितांची संख्या 399!

पुणे – करोनाबाधितांची संख्या सोमवारी कमी झाल्याचे समाधान व्यक्त करतानाच बुधवारी ही संख्या वाढल्याने पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे. दिवसभरात 399 नव्या बाधितांची नोंद झाली असून, नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जण पुण्याबाहेरीत आहेत.
बुधवारच्या 399 बाधितांचा समावेश करून आजपर्यंत 4 लाख 94 हजार 185 बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात 216 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांचा समावेश करून आजपर्यंत 4 लाख 83 हजार 221 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजपर्यंत 8 हजार 898 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय बाधितांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती, त्यात पुन्हा वाढ झाली असून, ती 2 हजार 66 झाली आहे. त्यातील 208 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच 257 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. दिवसभरातील स्वॅब टेस्ट केलेल्या संशयितांची संख्याही जास्त असून, ती 8 हजार 961 झाली आहे.





