Pune : नवे करोनाबाधित दोनशेपार
Updated On:

पुणे-दिवसभरात 205 नव्याने करोना बाधित आढळले असून, 250 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 जण पुण्याबाहेरील आहेत.
आजपर्यंत 30 लाख 73 हजार 832 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 4 लाख 93 हजार 786 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 4 लाख 83 हजार 005 जण बरे झाले आहेत. मात्र आजपर्यंत 8 हजार 893 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत बाधितांमधील 1 हजार 888 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 203 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच 242 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात 5 हजार 811 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आल्या.





