पुणे : दिवसभरात 97 करोनाबाधितांची नोंद

पुणे- गेल्या कित्येक दिवसांपासून 100 च्या पुढे असलेली करोना बाधितांची संख्या कमी झाली असून, सोमवारी शंभराच्या आत म्हणजे 97 इतकी बाधितांची संख्या नोंदवली गेली. गेल्या 24 तासांत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील पाच पुण्याबाहेरील आहेत.
22 ऑगस्ट रोजी रविवार हा सुटीचा दिवस असल्याने स्वॅब टेस्ट कमी होतात. त्यामुळे
बाधितांची संख्या कमी दिसत असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 97 बाधितांचा समावेश करून आजपर्यंत 4 लाख 91 हजार 959 बाधितांची नोंद झाली आहे.
बाधितांच्या दुप्पटीपेक्षा जास्त जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 24 तासांमधील डिस्चार्जची संख्या 233 नोंदवण्यात आली. यांचा समावेश करून आजपर्यंत 4 लाख 81 हजार 133 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सक्रीय बाधितांची संख्याही आता दोन हजारांपेक्षा कमी झाली आहे. सध्या असलेल्या बाधितांमध्ये 1 हजार 936 सक्रीय बाधित असून, त्यातील 205 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच 245 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. दिवसभरात 5 हजार 778 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.





