Pune : चोवीस तासांत 254 करोना बाधित
Updated On:

पुणे- शहरात गेल्या चोवीस तासांत 254 नवे करोना बाधित आढळले असून, बरे झालेल्या 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील पाचजणांसह 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात 2,186 सक्रिय बाधित असून, त्यातील 206 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर 258 बाधितांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
आजपर्यंत शहरात 30 लाख 36 हजार 223 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या आहेत. त्यात 4 लाख 91 हजार 262 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 4 लाख 80 हजार 208 रुग्ण बरेही झाले आहेत. दिवसभरात 9 हजार 507 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.





