Pune : स्वारगेट बसस्थानकाचे काम पूर्ण करा

पुणे : स्वारगेट मेट्रो स्थानक परिसरातील पीएमपीच्या नियोजीत बसस्थानकाच्या बांधकामाची पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी पाहणी केली. बसस्थानकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेशही त्यांनी दिले. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसशेड उभारणे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावणे आणि अतिक्रम हटविण्याबाबत संबधित विभागांना सूचना दिल्या.
यावेळी स्वारगेट वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षका शैलजा जानकर, प्रोजेक्ट मॅनेजर गोविंद कदम, महामेट्रोचे सल्लागार दत्तात्रय माने, पीएमपीचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतिश गव्हाणे उपस्थित होते. यावेळी दिपा मुधोळ-मुंडे यांनी स्वारगेट बसस्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसच्या संचलनाचा आढावा घेतला.
तसेच, प्रवाशांना संचलानादरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत माहिती घेऊन, त्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या. तसेच, स्वारगेट स्थानकावरील पीएमपीच्या नियोजित बसस्थानकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण करा, प्रवाशांना विश्वासार्ह व दर्जेदार सेवा मिळण्यासाठी पीएमपी-महामेट्रोने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मुधोळ-मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चौकट %
काय होणार बदल ?
– प्रवाशांसाठी बसशेड
-सुरळीत वाहतुकीसाठी बॅरिकेट्स
– महिला सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
– मेट्रो स्टेशनसमोरील अतिक्रमण हटवणार
– नियोजित बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे





