पुणे : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना साह्य देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने हात आखडता घेतला होता. यामुळे अनेकांना ही मदत अद्याप मिळालेली नाही. ही मदत मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन माने यांनी पाटील यांना दिले. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/kasba-assembly-by-election-grand-alliance-candidate-will-win-the-determination-of-balasahebs-shiv-sena/ या निवेदनानुसार, कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 30 दिवसांच्या आत 50 हजार रुपयांचे साह्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. हा निधी राज्य सरकारकडून सबंधित कुटुंबियांना वितरीत केला जातो. दुर्देवाने कोरोनाच्या दोन्ही लाटेत या महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून अनेकांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांना सहाय्य देण्यात आले आहे. मात्र तरतूद अपूरी पडल्याने एकट्या पुणे जिल्ह्यात एकूण 1053 जणांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने तातडीनं या निधीसाठी तरतूद करण्याची मागणी माने यांनी केली.