Pune : जीबीएसच्या उपाययोजनांवर मुख्यमंत्री नाराज? माजी आयुक्तांवर सोपविली जबाबदारी
Updated On:

पुणे : शहरात जीबीएसची साथ वाढत असतानाही त्याकडे महापालिका प्रशासनाला तातडीनं उपाय योजना करता आली नाही. तसेच या साथीबाबत गांभीर्याने उपाय योजना करणे आवश्यक असताना वेळकाढूपणा करण्यात आला, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या एका माजी आयुक्तांना या साथीबाबतचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांकडून सर्व संबधितांशी संपर्क साधून ही माहिती संकलीत करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
याद्वारे महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या साथीवर नियंत्रण तसेच उपाय योजनांसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच दखल घ्यावी लागली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.





