Pune : कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल

पुणे/कात्रज – शहरातील दोन महत्त्वपूर्ण ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. कात्रज चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कात्रज येथे असलेल्या पीएमपीच्या बसस्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहे. सोमवार (दि.२) पासून हा बदल करण्यात आला असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
तर, गणेश खिंड येथे मेट्रोचे खांब उभारणीचे काम सुरू असल्याने या ठिकाणीही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ चौकामध्ये पोर्टर बीमचे बांधकाम आणि रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर मेट्रो स्टेशनचे गर्डर लाँचिंगचे काम सुरू करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले असल्याचे वाहतूक पोलीस उपयुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
कात्रजमध्ये बसेसचा बदल…
– कात्रज-कोंढवा रस्ता बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस राजस सोसायटी चौकातून सुटतील.
– कात्रज बायपास बस स्थानकावरून बस क्र. ४३, ४३अ, ४४, ४५, २१४ सुटतील
– कात्रज सर्पोद्यान बसस्थानकाएवजी मार्ग क्र. ६१, २९२, २९३, २९६ व २९६अ बसेस गुजरवाडी स्थानक येथून सुटतील.
– कात्रज पोलिस चौकी बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस मार्ग क्र. २४, २४अ व २३५ सर्पोद्यान येथून सुटतील.
– कात्रज रोड बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसमार्ग क्र. २अ, ११क, ३०१, ३०१अ, रातराणी बसेस कात्रज डेपोतून संचलनात राहतील.
– गुजरवाडी-कात्रज बसस्थानकावरून सुटणारे बसमार्ग क्र. ४२, ९०, १०३, १०३म,
– कात्रज दूध डेअरीजवळ असणाऱ्या कचरा डेपोपासूनही बस संचलनात राहतील.
– बसमार्ग क्र. २९४, २९५ व २९७ हे तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत.





