Pune : गणेशोत्सवासाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
Updated On:

पुणे – श्री गणेशाची प्रतिष्ठापना व मूर्ती खरेदीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक विभागाने सोमवार (२५ ऑगस्ट) ते २७ ऑगस्ट या कालावधीत काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. पोलिस उपायुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील डेंगळे पूल ते शिवाजी पूल परिसर, श्रमिक भवनसमोर (आण्णाभाऊ साठे चौक), कसबापेठ, मंडई, सावरकर पुतळा – सिंहगड रोड, तसेच कुंभारवाडा आणि केशवनगर, मुंढवा येथे गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढील बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक बंद मार्ग व पर्यायी मार्ग –
- शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम मैय्या चौक या दरम्यानचा मार्ग वाहनचालकांसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग –
- गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ – कुंभारवेस चौक – शाहीर अमर शेख चौक मार्गे प्रवास करावा.
- शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्यांनी जंगली महाराज रोड – खंडोजीबाबा चौक – टिळक चौक मार्गे जावे.
- झाशी राणी चौक – खुडे चौक – डेंगळे पूल मार्गे जाणाऱ्या वाहनांनी म.न.पा.समोरून मंगला सिनेमा लेन – कुंभारवेस मार्गाचा वापर करावा.





