पुणे | धायरी फाटा येथील मनसेच्या ‘मी मराठी, स्वाक्षरी मराठी’ अभियानास मोठा प्रतिसाद

Updated On:
पुणे | धायरी फाटा येथील मनसेच्या ‘मी मराठी, स्वाक्षरी मराठी’ अभियानास मोठा प्रतिसाद

पुणे (सिंहगड रस्ता,प्रतिनिधी) : 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन, हा दिवस मराठी अस्मिता अभिमानाने मिरवण्याचा, हा दिवस मराठी जगण्याचा हा दिवस मराठी गाजवण्याचा. पण आज याच भव्य दिव्य आणि प्राचीन मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा प्राप्त होत नाहीये. म्हणूनच धायरी पुलाखाली शिवाजी मते ( शहराध्यक्ष, वाहतूक सेना) विजय मते (अध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ ) यांच्या अध्यक्षतेखाली आकाश साळुंखे, अतुल देवकर, हर्षल कुलकर्णी, बाळासाहेब हणमगर, राहुल वांळुजकर आणि अंगराज पिसे यांनी स्वाक्षरी मोहीम राबावली.

या प्रसंगी बोलताना मनसे उपाध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले, असा हा गौरव दिन, या गौरव दिनाच्या प्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो. मराठी भाषेचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे. या भाषेला आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून त्या ठिकाणी एक आदराचे स्थान हृदयात आहे. जगामध्ये मराठी बोलणाऱ्याची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये ही संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. जवळपास तेरा कोटी महाराष्ट्राची संख्या झालेली आहे आणि तेरा कोटी जनता मराठी बोलते त्यामुळे जगातील दहाव्या क्रमांकाची बोलणारी भाषा ही मराठी आहे. भारतामध्ये काही भाषांना अभिजात दर्जा दिला गेलेला आहे. परंतु अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही यासाठी एक लढाई सुरू आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली जातील. आज आमचे सहकारी शिवाजी मते यांनी एक ‘स्वाक्षरी मोहीम’ हा अभिनव उपक्रम केला आहे. त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. निश्चित या उपक्रमामुळे मराठीचा डंका जगभरात पुन्हा एकदा निनादेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी विजय मते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत. या स्वाक्षऱ्या आम्ही मनसे मार्फत केंद्र सरकारला पाठवणार. मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकरच प्राप्त झाला पाहिजे. माझ्या खडकवासला विधानसभा मतदार संघामधील तरुणांनी तसेच मनसेने येथील सर्व सहकाऱ्यांनी संकल्पना केली आहे.

ह्या मोहिमेचा शुभारंभ राजेंद्र वागस्कर नेते, गणेश सातपुते (उपाध्यक्ष,महाराष्ट्रराज्य), अजय शिंदे (सरचिटणीस), वनिता वागस्कर (महिला शहराध्यक्ष) यांच्या हस्ते धायरी येथे झाला. या कार्यक्रमांस निकिता चाकणकर (विभागाध्यक्षा), महादेव मते (उपजिल्हाध्यक्ष), सुनिल कोरपडे, बाळासाहेब मंडलिक, योगेश ढगे, कालिदास चावट, सचिन पांगारे, सुहास चाकणकर, रमेश करंजावणे, सुर्यकांत कोरे, विनोद थोपटे, योगेश चव्हाण आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

2026-05-26 05:00:18

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

2026-05-25 11:31:34

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

2026-05-24 05:00:33

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

2026-05-24 04:45:47

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन

2026-05-24 04:45:01

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन