Pune News : पुण्यात दहीहंडी मंडळावर पहिला गुन्हा दाखल! ८ बेस अन् ८ टॉप लावून ध्वनी प्रदूषण; बिबवेवाडी पोलिसांकडून साऊंड सिस्टीम जप्त
Pune News : दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंडळांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

Pune News : सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिसांनी एका मंडळावर गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टीम जप्त केली आहे. लाऊड स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप एवढीच परवानगी असताना आठ बेस आणि आठ टॉप असे लाऊड स्पीकर या मंडळाने लावले होते. (Pune News)
राहुल प्रकाश जगताप (रा. बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी) असे श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या वर्षीच्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेले पहिले मंडळ आहे. (Pune News)
याबाबत पोलीस अंमलदार प्रतिक दिलीप करंजे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी सुरुवातीपासूनच ध्वनी प्रदुषनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. प्लाझ्मा, मिक्सर ग्रिड तसेच लेझर लाईटला पुर्णपने बंदी घातली आहे. (Pune News)
ध्वनीयंत्रणेतील स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक लाऊंड स्पीकर लावून ध्वनी प्रदुषण केल्यास कारवाई करण्यात येईल़ साऊंड सिस्टिम जप्त करण्यात येईल असे सांगितले आहे. (Pune News)
बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याकडून पारंपारिक वाद्य वापरणेचा परवाना घेतला. त्यात लाऊड स्पीकर वापरण्याबाबतच्या लेखी आदेशाचा भंग करुन ८ बेस व ८ टॉप असे लाऊड स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे.
(Pune News)
त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक गरड तपास करीत आहेत. (Pune News)
Pune News : पुण्यात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात साजरी झाली अनोखी ‘व्यसनमुक्ती दहीहंडी’






