पुणे: सेक्सटाॅर्शन प्रकरणात एकाला जामीन
Updated On:

पुणे – सेक्सटाॅर्शन प्रकरणात अन्वरखान ऊर्फ सुबानखान (वय 29) याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी जामीन मंजूर केला आहे. तरूणाच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल आले.
इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीने तरूणाला त्याचे अर्धनग्न फोटो पाठविले. ते फोटो व्हायरल केल्याने त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ऐकीव माहितीवर गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये त्याचे नाव नाही. त्यामुळे जामीन देण्याची मागणी अॅड. राकेश सोनार आणि अॅड. महेश देशमुख यांनी केली होती.





