Carrom competition : कॅरम स्पर्धेत अशोक केदारी विजेते
Updated On:

पुणे :- सिंहगड रस्ता परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी विजेतेपद पटकावले आहे, अशी माहिती क्लबचे सदस्य आर. पी. जोशी यांनी कळवली आहे.
केदारी यांनी अंतिम लढतीत रशिद खान यांच्यावर 25-23, 25-22 अशी मात केली. हा सामना तब्बल अडीच तास चालला. या स्पर्धेत 125 खेळाडूंनी भाग घेतला होता. केदारी यांनी उपांत्य फेरीत प्रभाकर निंबाळकर यांचा 25-20, 25-24 असा पराभव केला होता.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत प्रभाकर निंबाळकर यांनी शरद पानसरे यांचा 25-20, 25-22 असा पराभव केला. या स्पर्धेत एकमेव ब्रेक टु फिनिश केदारी यांनीच केले. तर ब्लॅक टू फिनिश रशिद खान यांनी केले. पारितोषिक वितरण डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.





