पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात
Updated On:

पुणे- बंगळुरू-मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुलाजवळ तीन ट्रक पाठोपाठ धडकून अपघात झाला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
या अपघातात पहिला ट्रक हा कमी वेगाने जात होता. मागून वेगात आलेला ट्रक त्याला धडकला. यामुळे दोन्ही ट्रक अचानक महामार्गावर थांबले. त्यामागून येणाऱ्या तिसऱ्या ट्रकला अंदाज न आल्याने तोही दुसऱ्या ट्रकवर आदळला. तिन्ही अपघाती ट्रक रस्त्यावर असल्याने सुमारे पाऊण तास परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवून तिन्ही ट्रक बाजूला घेतले. यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली.





