Pune Accident : लोणीकंदजवळ भीषण अपघात ; टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी टेम्पो चालक आनंदा विनोद पवार (वय २१, रा. लोणीकंद, नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ५० वर्ष आहे. याबाबत पोलीस हवालदार विनोद भोसले यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भरधाव टेम्पो गुरुवारी (२ ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर टेम्पोने पादचाऱ्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.





