Pune Accident: सिंहगड रस्त्यावर डंपरची दुचाकीला धडक; महिला जखमी
Updated On:

Pune Accident: सिंहगड रस्ता परिसरात विश्रांतीनगरजवळ सोमवारी सायंकाळी सिमेंट वाहतूक करणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातग्रस्त महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुचाकीस्वार महिला सिंहगड रस्त्यावरून चालली होती. विश्रांतीनगर भागातील प्रकाश इनामदार चौकात राजाराम पुलाकडून सिंहगड रस्त्याकडे निघालेल्या डंपरने दुचाकीस्वार महिलेला धडक दिली.
नागरिकांनी अपघातग्रस्त महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, गेल्याच आठवड्यात सिमेट मिक्सरच्या धडकेत प्रयेजा सिटी परिसरात एका महिलेचा मृत्यू झाला होता.





