पुण्यात आमदाराच्या पुतण्याने बेदरकारपणे दोघांना चिरडले ; एकाच जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Pune Accident । पुण्यातील पोर्शे अपघातानंतर पुन्हा एकदा याठिकाणी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याचे म्हटले
पुणे-नाशिक महामार्गावर कळंब याठिकाणी झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्या बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मयूर मोहिते असे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचे नाव आहे. अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्याने मद्य प्राशन केलेले का? याचाही तपास सुरू आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीने चिरडले. या घटनेत ओम भालेराव (19) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा
नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात





