पुणे : पैशांच्या वादातून तरुणाला पेटवले
Updated On:

पुणे – हातउसने घेतलेले 10 लाख रुपये वेळेत परत न दिल्याच्या रागातून तरुणाने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही घटना 30 सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास फुरसुंगी येथील संकेत विहारजवळ घडली. उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज मोहन कांदे (वय 28) याला अटक केली आहे. संतोष कागदे (वय 51, रा. आंबेगाव बुद्रूक) असे मृताचे नाव आहे. पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मनोजकडून 10 लाख रुपये उसने घेतले होते. त्यानंतर पैसे माघारी देण्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते.





