पुणेकरांना दिलासा नाहीच, दिवसभरात 830 नवे करोना बाधित
Updated On:

पुणे – गेल्या 24 तासांत 830 नवे करोना बाधित सापडले असून, 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनंतर शहरातील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 383 झाली असून, 1 लाख 95 हजार 342 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात 551 डिस्चार्ज देण्यात आले आहे.
दिवसभरात नऊ बाधितांचा मृत्यू झाला असून, चार बाधित पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत 4881 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांमधील 6160 रुग्ण ऍक्टीव्ह असून, त्यातील 300 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर 664 जण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात 7 हजार 267 जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून, आजपर्यंत एकूण 11 लाख 77 हजार 650 संशयितांच्या टेस्ट झाल्या आहेत.




