पुणे : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ८ उंटांना जीवदान
Updated On:

पुणे : पुण्यामधून कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून आठ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोनजणांना ताब्यात घेतले आहे.
अरुण कुमार चिनाप्पा ( २८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि लखन मगन जाधव (३०, रा. करपटे वस्ती रोड, कलावती मंदीर शेजारी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कृष्णा तुळशीराम सातपुते ( २४, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहें




