Pune: १५ पुलांच्या डांबरीकरणासाठी साडेचार कोटी; स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव

पुणे – शहारातील १५ पुलांचा दोष दायित्व कालावधी संपलेला असून या पूलांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याची झिज झाल्याने दुरूस्ती आवश्यक आहे. त्यामुळे या पूलांचे डांबरीकरण केले जाणार असून त्यासाठी ४ कोटी ४२ लाख रूपयांची निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे.नदीवरील पुल, उड्डाणपूल आणि रेल्वे उड्डाणपूलांचा यात समावेश आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर जोडण्यासाठी आणि पुणे शहराचे दोन भाग जोडण्यासाठी एकूण ३२ पूल आहेत. शहरातील विविध भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या १७ चौकांमध्ये उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. ९ ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल असे शहरात सर्व प्रकारचे मिळून ५८ पूल आहेत.
त्यामुळे ४३ पुलांचे काम दोष दायित्व कालावधीतील आहेत, त्यामुळे त्यांची देखभाल दुरुस्ती, डांबरीकरण, स्वच्छता अशी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. मात्र, ज्या पूलांचा दोष दायित्व कालावधी संपला आहे त्याची जबाबदारी महापालिकेकडे असल्याने हे काम केले जाणार आहे.
या पूलांंवर होणार डांबरीकरण…
बाबाराव भिडे पूल, आगाखान पूल, जुना संगम पूल, अलंकार टॉकीज रेल्वे उड्डाणपूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल (बंडगार्डन), हडपसर गाडीतळ पूल, मगरपट्टा चौक उड्डाणपूल, हडपसर किर्लोस्कर न्यूमॅटिक रेल्वे उड्डाणपूल , टिळक पूल, काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज), वेलल्सी पूल (कामगार पूल), जुना हॅरिस पूल, त्रिंबक डेंगळे पाटील पूल, जुना पूल (जहाँगीर रुग्णालय), राजीव गांधी पूल.





