Poona Club Premier League 2024 : कपिला परमार ऑल स्टार्स संघाची आगेकूच…

Poona Club Premier League Cricket Tournament 2024 : पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत कपिला परमार ऑल स्टार्स संघाने दुसरा विजय मिळवला. पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सुमेध गांगल (नाबाद ४१ धावा व १-१०) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने व्हीके टायगर्स संघाचा २७ धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात प्रकाश कारिया ३३ धावांच्या खेळीच्या जोरावर कपिला परमार ऑल स्टार्स संघाने फोर ओक्स सेलर्स संघाचा ४ धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. मनप्रीत उप्पल नाबाद २५ धावांच्या जोरावर पृथ्वी लायन्स संघाने व्हीएनएन वुल्व्हस संघाचा ७ गडी राखुन पराभव केला.
Team India : पुजाराची कारकीर्द जवळपास संपूष्टात, ‘ती’ शक्यताही ठरली फोल….
करण शर्माच्या ३५ धावांच्या जोरावर तलब टायटन्स संघाने क्वालिटी वॉरियर्स संघाचा २० धावांनी पराभव करून विजय नोंदवला. अन्य लढतीत आधिश शहा ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्स संघाने जेटस संघाचा ७ गडी राखून पराभव करून पहिला विजय मिळवला.



