Poona Club Premier League 2024 : फोर ओक्स सेलर्स, कपिला परमार ऑल स्टार्सची आगेकूच…

Poona Club Premier League 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, फोर ओक्स सेलर्स, कपिला परमार ऑल स्टार्स या संघानी आगेकुच केली.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रौनक ढोले पाटील (३१ धावा व १-१२) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फोर ओक्स सेलर्स संघाने वॉरियर्स संघाचा ३ धावांनी पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात आधिश शहा नाबाद ४८ धावांच्या जोरावर ओबेरॉय आणि नील किंग्स संघाने पृथ्वी लायन्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत तिसरा विजय नोंदवला.
Athletics : हतोडाफेकपटू ‘रचना कुमारी’वर तब्बल 12 वर्षांची बंदी, समोर आलं ‘हे’ कारण…
अन्य लढतीत भार्गव पाठक (नाबाद ३८ धावा व १-१०) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने जेट्स संघाचा ८ गडी राखून सलग चौथा विजय नोंदवला. क्रिश शहा (नाबाद ५९ धावा व २-३) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने तलब टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला.



