जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक ; सुरक्षा दलांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

Pulwama Encounter। जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पुलवामाच्या निहामा भागात सुरक्षा दलांनी दोन-तीन दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन-तीन दहशतवाद्यांना घेरले Pulwama Encounter।
सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, निहामामध्ये काही दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांकडूनही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला जात आहे. या परिसरात २-३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे.
#WATCH जम्मू-कश्मीर: पुलवामा जिले के निहामा इलाके में मुठभेड़ जारी है। पुलिस और सुरक्षा बल ऑपरेशन को अंजाम दे रहे हैं।
(वीडियो वर्तमान समयानुसार नहीं है।) https://t.co/9rTN8EQk1A pic.twitter.com/qDz7Yk5Dpc
— ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2024
काश्मीर झोन पोलिसांनीही ट्विट करून सांगितले की, निहामा, पुलवामा येथे चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल शोकार्यात व्यस्त आहेत.
यापूर्वीही शस्त्रसाठा केला होता जप्त Pulwama Encounter।
यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत कुपवाडामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. ऑपरेशन कोट नाला अंतर्गत ही शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले होते.
चिनार कॉर्प्सने ट्विट करून सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी कुपवाडाच्या घनदाट जंगलात शोध मोहीम राबवली. यादरम्यान दहशतवाद्यांचा छडा उद्ध्वस्त करण्यात आला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.





