Puducherry Election Result: पुदुच्चेरीत भाजप आघाडीवर; एन. रंगास्वामी पुन्हा मुख्यमंत्री?
Puducherry Election Result: पुडुचेरीमध्ये ३० जागांसाठी निवडणूक झाली असून, येथे दोन प्रमुख आघाड्यांमध्ये मुख्य लढत आहे.

Puducherry Election Result: एप्रिल महिन्यात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका पार पडल्या. ज्यामध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून, दिवसाच्या अखेरपर्यंत कोणत्या पक्षाचे सरकार येईल किंवा कोण सत्तेत टिकून राहील, हे स्पष्ट होईल.
पुडुचेरीमध्ये चौथ्या कार्यकाळासाठी प्रयत्न (Puducherry Election Result)
पुडुचेरीमध्ये ३० जागांसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत दोन प्रमुख आघाड्यांमध्ये मुख्य लढत आहे. एक आघाडी सत्ताधारी ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) असून त्यात भाजप सहभागी आहे.
दुसरी आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स आहे, ज्यात द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) देखील आहे. येथे आता मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील AINRC चौथ्यांदा सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहे. ( Puducherry Election Result)
कोणाची आघाडी?
ताज्या कलानुसार, भाजप-प्रणीत आघाडीने (NDA) बहुमताचा आकडा गाठला आहे, ज्यामुळे सत्तेचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. पुडुचेरी विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत. (Puducherry Election Result)

Puducherry Election Result: पुदुच्चेरीत भाजप आघाडीवर; एन. रंगास्वामी पुन्हा मुख्यमंत्री?
ताज्या माहितीनुसार, भाजपचे ए. नमस्सिवायम (मानाडीपेट) आणि व्ही. पी. रामलिंगम (राजभवन) आपापल्या जागांवर पुढे आहेत. तसेच AINRC प्रमुख आणि मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनीही मंगलम मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. या कलांवरून पुडुचेरीमध्ये सध्या भाजप-AINRC आघाडी अत्यंत मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा:





