Sunetra Pawar : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांनंतर जाहीर होणार आहे. त्यानंतर येथील चित्र स्पष्ट होईल. सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या आठ फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांचे लीड वाढतच चाललेले दिसत आहे. अजून मतमोजणीच्या काही फेऱ्या बाकी असून अशातच सुनेत्रा पवारांनी एक्स अकाऊटंवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी अजित पवार यांची आठवण काढली आहे. तसेच या ट्वीटमधून त्यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. (Sunetra Pawar) आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत, असे ट्वीटमध्ये सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. Sunetra Pawar आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम… — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 4, 2026 नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार ? (Sunetra Pawar) आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!