Pune District : यशवंत पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेली यशवंत नागरी पतसंस्थेचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते व माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, उपाध्यक्ष राजाराम घोटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी शिवसेनेचे मंगेश काकडे, लोकनियुक्त सरपंच मेघा काकडे, उपसरपंच मयूर पवार, दीपक लेंडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप लेंडे, नितीन काकडे, सतीश काकडे, स्नेहा शेटे, कल्पना कोकाटे, अॅड. डिंपल घाडगे, सत्यवान काकडे, संचालक फकीर इनामदार, संजय वाघ, संस्थेचे सल्लागार लक्ष्मण मंडलिक, मुख्य कार्यकारी अधिकारी रंजना मंडलिक व सेवक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन 31 डिसेंबर 2024 अखेरचा संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. संस्थेच्या भविष्यातील विविध योजना आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी महादेव वाघ व शरद लेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेची आर्थिक परिस्थिती
व्यवसाय कर्ज (प्रॉपर्टी तारण) : 75 लाखापर्यंत
सभासद : 6336
एकूण शाखा : पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळेफाटा, नारायणगाव
वसूल भाग भांडवल : 5 कोटी 17 लाख
स्वनिधी : 18 कोटी 23 लाख
ठेवी : 96 कोटी 93 लाख
कर्ज : 76 कोटी 8 लाख
गुंतवणूक : 45 कोटी 76 लाख
नफा : 2 कोटी 71 लाख
एकत्रित व्यवसाय : 240 कोटी 57 लाख
सर्व व्यवहार : सीबीएस सिस्टीममध्ये उपलब्ध
सेवा : एनईएफटी व आरटीजीएस





